हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांनी काही दिवसांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएस सेवा देणारे वेगळे रिचार्ज प्लान सादर करण्याचे निर्देश दिले होते. ट्रायच्या या आदेशानंतर, देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जसे की एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया (VI) यांनी आपापल्या ग्राहकांसाठी कॉलिंग आणि एसएमएस केंद्रित नवीन प्लान्स बाजारात आणले आहेत. यामध्ये एअरटेलने (Airtel) आपल्या कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लानमध्ये मोठे बदल केलेले दिसत आहेत.
एअरटेलने प्लानच्या किंमतीत कपात केली
एअरटेलने सुरुवातीला ४९९ रुपये आणि १९५९ रुपये किंमतीचे दोन प्रीपेड प्लान्स सादर केले होते. मात्र, ग्राहकांचा अधिक फायदा लक्षात घेऊन कंपनीने या प्लान्समध्ये किंमतीसंबंधी महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ४९९ रुपयांच्या प्लानची किंमत घटवून ४६९ रुपये करण्यात आली आहे. तर १९५९ रुपयांचा प्लान ग्राहकांना १८४९ रुपयांना मिळणार आहे.
४६९ रुपयांचा प्लान
नवीन किंमत सुधारित ४६९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस मोफत मिळतील. परंतु, या प्लानमध्ये कोणताही इंटरनेट डेटा समाविष्ट नाही. त्यामुळे फक्त कॉल आणि मेसेजसाठीच हा प्लान उपयुक्त आहे. यामध्ये पूर्वीच्या ४९९ रुपयांच्या प्लानच्या तुलनेत आता ग्राहकांना ३० रुपयांची बचत होणार आहे.
१८४९ रुपयांचा प्लान
एअरटेलने वार्षिक प्लानच्या किंमतीतही सुधारणा केली आहे. आता १९५९ रुपयांच्या प्लानची किंमत कमी करून १८४९ रुपये करण्यात आली आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना संपूर्ण ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० मोफत एसएमएसचा लाभ मिळणार आहे. परंतु यामध्ये इंटरनेट डेटा उपलब्ध नसणार आहे. एअरटेलने केलेल्या किंमत कपातीमुळे फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.