हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज कालच्या आधुनिक जगात सर्वजण ऑनलाईन पद्धतीने पैशांची व्यवहार करत आहेत. परंतु तुम्ही देखील ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, आता इथून पुढे 1 किंवा 2 लाख रूपये नाही तर तब्बल 5 लाख रुपये ऑनलाईन पाठवता येणार आहेत. ही रक्कम पाठवण्यासाठी तुम्हाला IMPS म्हणजेच इमीडिएट पेमेंट सर्विसचा वापर करावा लागणार आहे. हे तुम्हाला फोन किंवा नेट बँकिंगशी जोडावे लागेल. त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर टाकून समोरील व्यक्तीला पैसे पाठवू शकता.
1 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू
येत्या 1 फेब्रुवारीपासून IMPS च्या नियमात मोठे बदल होणार आहेत. या नव्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवताना फक्त त्या व्यक्तीचे नाव आणि मोबाईल नंबर लागणार आहे. यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला IMPS फोन बँकिंग किंवा नेट शी जोडावे लागेल. सध्या IMPS वरून एखाद्याला रक्कम पाठवताना बँकेची माहिती आयएफएससी कोड टाकावा लागतो. मात्र नव्या नियमानुसार अशी कोणतीही माहिती भरावी लागणार नाही.
तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही पाच लाखांपर्यंत रक्कम पाठवू शकता. यासाठी तुम्हाला समोरील व्यक्तीचा बँक खात्यात नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर आणि त्या व्यक्तीचे नाव लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही थेट मोठी रक्कम ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकता. यामुळे तुमचा वेळ देखील तितकाच वाचतो. तसेच, पूर्वीच्या किचकट पद्धतीतून तुमची सुटका देखील होईल. या नव्या नियमामुळे तुम्हाला कोणतेही मोठी रक्कम पाठवण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही.