मध्य रेल्वेवरील कल्याण – बदलापूरदरम्यान मोठ्या पायाभूत कामांसाठी शनिवारी विशेष वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामांमध्ये नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासह उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीचा समावेश आहे. ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल होणार असून काही लोकल गाड्या अंशतः किंवा पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांचा विचार करावा.
‘या’ करणामुळे ब्लॉक
ब्लॉक कालावधी: शनिवारी रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 असून या ब्लॉक च्या वेळेमध्ये रेलवे प्रशासनाकडून नवीन पाइपलाइन पूल उभारणी तसेच
उड्डाणपुलासाठी गर्डर बसवणे अशी कामे करण्यात येणार असून यासाठी दोन मोठ्या क्रेन्सचा वापर करण्यात येणार आहे.
लांबपल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदल
ब्लॉक दरम्यान काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येतील. तसेच, कल्याणच्या नियोजित थांब्याऐवजी ठाणे येथे थांबा दिला जाईल.
वळवण्यात येणाऱ्या गाड्या:
गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैनसागर एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 11140 होसपेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 22158 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
स्थानकांवर तात्पुरता थांबा:
सिकंदराबाद – राजकोट एक्स्प्रेस (22178) – वांगणी येथे 4:10 ते 4:30 पर्यंत
तिरुनेलवेली – दादर एक्स्प्रेस (11022) – नेरळ येथे 4:17 ते 4:27 पर्यंत
रद्द होणाऱ्या लोकल सेवा
अंबरनाथ – कर्जत स्थानकांदरम्यान कोणतीही लोकल चालणार नाही.
रात्री 11:13 वाजता परळहून सुटणारी परळ – अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंतच धावेल.
रात्री 11:51 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बदलापूर लोकल अंबरनाथ येथे अंशतः रद्द.
रात्री 12:12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल.
रात्री 2:30 वाजता कर्जतवरून सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल आणि तिथून रात्री 3:10 वाजता पुढे सुरू होईल.
विशेष लोकल गाड्या
कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल
प्रस्थान: पहाटे 4:10 वाजता (कर्जत)
पोहोच: सकाळी 6:08 वाजता (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
- प्रवाशांनी प्रवास करण्याआधी नवीन वेळापत्रक आणि मार्ग बदल तपासून पहावे.
- ब्लॉक दरम्यान पर्यायी मार्गाने प्रवासाचा विचार करावा.
- प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना आवश्यक माहिती देत आहे.
- शनिवार रात्री प्रवास करणार असाल, तर वेळापत्रक नीट तपासा आणि योग्य नियोजन करा.