हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला कुठे ना कुठे गुंतवणूक करायची असते. मात्र नक्की कुठे गुंतवणूक करावी याची योग्य माहिती नसल्यामुळे ती करता येत नाही. आज आम्ही तुम्हांला अशाच एका योजनेबाबत माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राह्ण्या बरोबरच मॅच्युरिटीवर चांगले पैसेही मिळतील. अशा या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD). यामध्ये तुम्हांला 100 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करता येईल. रिकरिंग डिपॉझिट स्कीम (RD) वर सध्या 5.8 टक्के दराने व्याज मिळत आहे.
RD खाते 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी उघडता येते. यामध्ये एखाद्या व्यक्तीला हवी तेवढी रक्कम जमा करता येईल, कारण यामधील गुंतवणुकीला कोणतेही लिमिट नाही. तसेच यामध्ये जमा केलेल्या रकमेनुसार तुम्हांला रिटर्नही मिळेल. या योजनेंतर्गत जमा केलेल्या पैशावर आकारले जाणारे व्याज तिमाही आधारावर मिळते. हे चक्रवाढ व्याज आहे, जे प्रत्येक तिमाहीच्या शेवटी खात्यात जोडले जाते.
कर्ज देखील घेता येईल ?
पोस्ट ऑफिसच्या या खात्यामध्ये कर्जदेखील उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी एक अट आहे, ती अशी की या खात्यामध्ये 12 हप्ते जमा केल्यानंतरच कर्जाची सुविधा घेता येईल. तसेच या खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येईल. मात्र या कर्जासाठी RD खात्यावरील व्याजापेक्षा 2 टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. RD खात्याच्या कालावधीपर्यंत या कर्जाची परतफेड न केल्यास, कर्ज म्हणून दिलेली रक्कम मुदतपूर्तीच्या रकमेतून कट केली जाईल.
हे खाते कोणा-कोणाला उघडता येईल ?
यामध्ये तुम्हाला हवी तेवढी खाती उघडता येतील. या योजनेमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. या योजनेमध्ये जॉईंट अकाउंटही उघडता येईल. तसेच आपल्या मुलाच्या नावाने पालकही खाते उघडू शकतील.