दिवाळीत अशा पद्धतीने बनवा खुसखुशीत शंकरपाळी; एकदा खाल तर खातच राहाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीमध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो तो म्हणजे शंकरपाळी. परंतु अनेकवेळा ही शंकरपाळी बनवताना ती फुटते किंवा कडक होते. त्यामुळे आज आपण शंकरपाळी बनवण्याची अशी एक अनोखी रेसिपी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत आणि मऊ बनतील. चला तर मग जाणून घेऊया शंकरपाळी बनवण्याची खास रेसिपी…

शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा 500 ग्राम
साजूक तूप 110 ग्रॅम
पिठी साखर 125 ग्रॅम
दूध 110 ml ते 125 ml
तेल किंवा तूप
मैदा 4 वाट्या
साजूक तूप ½ वाटी
पिठी साखर 1 वाटी
दूध ½ वाटी

कृती

1. सर्वात प्रथम एका पसरट ताटात तूप थंड व पातळ करून घ्या आणि त्यात पिठीसाखर घाला. त्यानंतर या दोन्ही गोष्टी आपल्या स्वच्छ हाताने एकजीव करून घ्या.

2. या मिश्रणाला चांगले फेटल्यानंतर त्यामध्ये एक कपभर दुध घाला. आता हे मिश्रण एकजीव करा. यानंतर त्यामध्ये हळूहळू मैदा घाला.

3. या सारणाला एकत्र मळून घ्या पीठ कडक झाले तर त्यात चमचा भर दूध घालून पुन्हा ते व्यवस्थित मऊ असे मळून घ्या.

4. काही वेळासाठी हे पीठ सैल होण्यासाठी तसेच ठेवून द्या. यानंतर या पिठाचे गोळे तयार करा.

5. या गोळ्यांची जाडसर चपाती लाटून घ्या आणि तिला शंकरपाळ्यांचा आकार द्या.

6. यानंतर दुसऱ्या बाजूला मंद आचेवर तेल गरम करून घ्या. आणि या तेलामध्ये तुम्ही बनवलेल्या शंकरपाळ्या तळून घ्या.

7. शंकरपाळी तळताना गॅस बारीक ठेवा नाहीतर त्या जळू शकतात वा कडक होऊ शकतात. शंकरपाळी व्यवस्थित तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ती टम्म फुगलेली आहे. यानंतर ते थंड झाल्यावर आपल्याला हे देखील समजून येईल ती खुसखुशीत झाली आहे की नाही.