दिवाळीत झटपट बनवा ब्रेडचे गुलाबजाम; ही रेसिपी करा ट्राय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आलेच. यंदाच्या दिवाळीत तुम्हाला जर झटपट गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही ब्रेडचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता. कारण, ब्रेडचे गुलाबजाम अगदी काही मिनिटात बनवून तयार होतात आणि यासाठी जास्त कष्ट देखील घ्यावे लागत नाही. त्यामुळेच दिवाळीच्या गडबडीत तुमचे कष्ट वाचवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला झटपट बनणाऱ्या ब्रेडच्या गुलाबजामची रेसिपी सांगणार आहोत. (Diwali Food And Recipe)

गुलाबजामचा पाक बनवण्याचे साहित्य

2 वाटी साखर
2 मोठे ग्लास पाणी
2 टी स्पून वेलची पावडर

गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य

1 पॅकेट ब्रेड स्लाइसचे
1 कप दूध
काजूचे तुकडे
केशर
तूप वा तेल
बदाम, पिस्ता सजावटीसाठी

पाक बनवण्याची कृती

सर्वात प्रथम एका कडईत साखर व पाणी एकत्र करून मंद आचेवर पाक बनवण्यासाठी ठेवा. हा पाक लगेच 5 ते 7 मिनिटांत तयार होईल. तो तयार झाल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि केसर घाला आणि गॅस बंद करून भांडे झाकून ठेवा.

गुलाबजाम बनवण्याची कृती

– गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात प्रथम ब्रेडच्या चारी बाजूच्या कडा कापून घ्या. आणि मधला पाव बाजूला काढा.

– यानंतर या पावाचे तुकडे करून त्याचा चुरा करा. पुढे या चुऱ्यामध्ये थोडे थोडे दूध घालून हा चुरा पिठासारखा मळून घ्या. पीठ सैल आणि घट करू नका. हे पीठ मळून झाल्यानंतर त्याला पाच मिनिटे बाजूला ठेवा.

– मळलेल्या पिठाचे नंतर छोटे छोटे गोळे करा. या गोळ्यांमध्ये काजूचे बारीक तुकडे घाला. त्यानंतर व्यवस्थितरित्या हे गोळे गोल बनवा.

– सर्व गोळे बनवून झाल्यानंतर कढईमध्ये मंद आचेवर तेल किंवा तूप तापवून हे गोळे त्यात टाका. आणि ते व्यवस्थित तळून घ्या.

– हे गोळे तळल्यानंतर त्यांना साखरेच्या बनवलेल्या पाकामध्ये टाका. पाच मिनिटे तरी हे गोळे साखरेच्या पाकातच असू द्या.

– यानंतर गोळे आणि पाक एका काचेच्या बाऊलमध्ये काढा आणि त्यावर बदाम किंवा पिस्ता चिरून घाला. अशा पद्धतीने तुमचे झटपट ब्रेडचे गुलाबजाम तयार असतील.