अशी बनवा मालवणी मटण करी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊ गल्ली | मटण म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत मालवणी मटण करीची रेसिपी. वाचा , बनवून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा.

‘धनगरी मटण पाया कालवण’ कसे बनवतात?

मालवणी मटण करी बनवण्याचे साहित्य
१ किलो मटण, हळद, मीठ, मलवणी मसाला, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची एक वटी पेस्ट ,गरम मसाला, १ कांदा चिरून, १ टोम्याटो चिरून, तमाल पत्र, चार कांदे उभे चिरून, एका ओल्या नारळाचा खिस, अर्ध्या सुक्या नारळाचा खिस, फोडणीला तेल.

कोल्हापुरी मटणाचा पांढरा रस्सा

कृती

सर्व प्रथम मटण स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर त्याला मालवणी मसाला, हळद, मीठ लावून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर ते अर्धा तास झाकून ठेवावे. या दरम्यान मालवणी करीसाठी वाटण बनवून घ्या. या वाटणाला मालवणी वाटण म्हणतात. चार कांदे उभे चिरून ते तेलात तळून घ्या. एका ओल्या नारळाचा खिस आणि अर्ध्या सुक्या नारळाचा खिस त्यासोबत तळलेला कांदा मिक्सरमधून वाटून घ्या. या मिश्रणाला मालवणी वाटण असे म्हणतात.

कशी बनवतात चिकन चिली ?

एका कढईत एक छोटी वाटी तेल घ्या. त्यात तमालपत्र तडतडू द्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला एक कांदा , टोम्याटो घाला. त्यानंतर ते चांगले भाजू द्या. मग त्यात अर्धा तास झाकून ठेवलेले मटण घाला. मटण तेलात चांगले परतू द्या. त्यानंतर थोडावेळ ते मटण झाकून ठेवा. त्यानंतर त्यात आवश्यकते नुसार पाणी घाला आणि एक उखळी येऊ द्या. एक उखळी आली की त्यात मालवणी वाटण घाला आणि मटण शिजले की पानात वाडा.

अशी बनवतात चिकन स्क्रीप्सी

जाणून घ्या कसे बनवतात चिकन सीस्क्टीफाय

Leave a Comment