Malaika Arora Father Death | मलायका अरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर; इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून वडिलांनी संपवले आयुष्य

Malaika Arora Father Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Malaika Arora Father Death | बॉलीवूडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मलायका आरोरा (Malaika Arora) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मलायका अरोरा हिचे वडील (Malaika Arora Father Death) अनिल अरोरा यांनी आज म्हणजे 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. त्यांनी वांद्रे येथील त्यांच्या इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलेले आहे. त्यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून त्यांचे आयुष्य संपवलेले आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये खळबळ उडालेली आहे.

या घटनेचा घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहे. आणि त्यांनी प्राथमिक चौकशीला देखील सुरुवात केलेली आहे. परंतु मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या सारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून याबाबत वेगवेगळे तपास सुरू झालेले आहेत. तसेच पोस्टमार्टमसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात देखील पाठवला गेलेला आहे. वडिलांच्या आत्महत्याची बातमी समजली, त्यावेळी मला एका पुण्यात होती. ही बातमी समजली तेव्हा ती लगेच मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

मलायका अरोराचे वडील (Malaika Arora Father Death) अनिल अरोरा हे मागील वर्षी प्रकृतीच्या कारणामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. परंतु त्यांच्यावर नक्की कसे उपचार चालू होते? त्यांना मानसिक दृष्ट्या काही त्रास होत होता? का याबद्दलची माहिती अजूनही समोर आलेली नाही.