मोठी दुर्घटना!! प्रवासी बोट उलटून 21 जणांचा मृत्यू (Video)

malappuram passenger boat accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये (Kerala) प्रवासी बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ बोट उलटली. या दुर्घटनेनंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य अजूनही सुरु आहे. ही बोट नेमकी कशी पलटली याबाबत खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तुवालाथीराम बीचजवळ हा अपघात झाला. बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रादेशिक अग्निशमन परिक्षेत्र अधिकारी शिजू केके यांनी सांगितले की, बोटीत नेमके किती लोक होते हे समजू शकले नाही. अशा परिस्थितीत आणखी लोक अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदींनी ट्विट करत म्हंटल की, केरळमधील मलप्पुरममध्ये बोट दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी दुःखी आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या प्रति माझ्या संवेदना…. असं म्हणत मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा मोदींनी केली आहे