खाऊगल्ली | मालवणी कोंबडी वडे हा कोकणातील स्पेशल पदार्थ आहे, याचे नाव कोंबडी वडे असले तरी हा प्रकार पूर्ण शाकाहारी आहे. अनेक डाळी एकत्र करून हे वडे बनविले जातात. शक्यतो चिकन किंवा मटण बरोबर हे वडे खातात. पण नुसत्या चहा बरोबर सुद्धा खाऊ शकतात.
साहित्य –
१) १ कप तांदळाचे पीठ
२) पाव कप चण्याचे पीठ
३) अर्धा कप उडीद डाळ
४) १ टीस्पून धणे
६) अर्धा टीस्पून हळद
७) अर्धा टीस्पून जिरे
८) ३ टीस्पून तेल
९) चवी पुरते मीठ
कृती –
अगोदर एक रात्र उडीद डाळ चांगली ३-४ वेळा स्वच्छ धुऊन मोठ्या भांड्यात भिजत ठेवा.
दुसरे दिवशी पाणी गळून टाका आणि डाळ मिक्सरला थोडीशी जाडसर लाऊन घ्या.
नंतर धणे व मेथी एकत्र मिक्सरवर बारीक लाऊन पावडर करा.
आता परातीत तांदळाचे पीठ,चना पीठ,हळद, जिरे, धणे व मेथीची पावडर,
मीठ आणि जिरे एकत्र करा आणि ३ टीस्पून तेल गरम करून त्यात टाका.
हे मिश्रण चांगलं ढवळा आणि मग त्यात वाटलेले उडदाचे पिठी ओतून पीठ मळायला सुरुवात करा.
आवश्यकते नुसार थोडंस पाणी घ्या पण पीठ घट्ट मळून घ्या व १५-२० मिनिटं तसचं ठेवा.
आता साधारण छोट्या लिंबाच्या आकाराचे पीठाचे गोळे करून घ्या.
प्रत्येक गोळ्याला थोडंसं तेल लाऊन केळीच्या पानावर किंवा जाडसर प्लास्टिक पिशवीवर (दुधाच्या) किंवा हाताचा तळव्यावर हळूहळू थापटून पुरी प्रमाणे पसरट गोल आकार द्या.
कढईत तेल चांगलं तेल तापल्यावर दोनी बाजूने फिकट बदामी रंगाचे होईस्तोवर वडे तळून काढा.
इतर महत्वाचे –
म्हणून विधीमंडळाच्या अधिवेशनाला स्थगिती …