हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालदीवच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये (Maldivian General Election) भारताबाबत वादग्रस्त विधान करणारे चिनप्रेमी विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली पीपुल्स नॅशनल काँग्रेसने 60 पेक्षा अधिक जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलय. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण काही महिन्यांपूर्वी याच मोहम्मद मुइज्जू यांनी भारत आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होत आणि त्यामुळे भारताने बायकॉट मालदीव ट्रेंड सुद्धा चालवला होता. अनेक भारतीयांनी आपली मालदीवची बुकिंग रद्द केली होती. मात्र हे वातावरण ताज असतानाच आता पुन्हा एकदा मालदीवमध्ये मुइज्जू यांची सत्ता आल्याने भारतासाठी चिंतेजी बाब म्हणावी लागेल.
मालदीवमधल्या संसदीय निवडणुकीसाठी 6 पक्षांचे 368 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सहा पक्षांमध्ये मुइज्जू यांची पीपुल्स नॅशनल काँग्रेस (PNC ), मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी (MDP) आणि130 अपक्ष होते. सुरुवातीला हाती आलेय निकालानुसार, मुइझ्झू यांच्या पक्षाने ९३ सदस्यांच्या संसदेमध्ये एक तृतियांश जागा मिळवल्या आहेत. निकाल जाहीर करण्यात आलेल्या ८६ जागांपैकी PNC ला ६६ जागा जिंकता आल्यात. त्यामुळे मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाने सहज बहुमत प्राप्त केलंय. मे महिन्याच्या सुरुवातील मालदीवमध्ये नवीव संसद सदस्य पाहायला मिळतील..
President Dr @MMuizzu cast his ballot in the 2024 Parliamentary Elections. The voting process took place at the polling station for the President's constituency at the Thaajudheen School. pic.twitter.com/p4pHuXzx2R
— The President's Office (@presidencymv) April 21, 2024
मोहम्मद मुइझ्झू यांनी चीनसोबत आर्थिक संबंध सुधारले आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी भारताऐवजी चीनच्या दौऱ्याला जास्त प्राधान्य दिलं होतं. शिवाय मुइझ्झू यांची धोरणे चीनधार्जिणे राहिले आहेत. आताही पुन्हा एकदा तेच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्याने आधीची त्यांची जी काही ध्येयधोरणे होती तीच ते पुढे रेटतील आणि भारताला विरोधक म्हणूनच पाहतील. त्यामुळे मोहम्मद मुइझ्झू यांचा विजय भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.