कराड | मल्हारपेठ- मुंद्रुळहवेली येथील लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, मंद्रुळहवेली व परिसरातील 12 वाड्या वस्त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी सेवा सोसायटी मल्हारपेठ (मंदुळहवेली) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 12-0 अशी बिनविरोध करण्यात आली.
प्रथम परस्पर दोन्ही गटातून 13 पैकी 1 जागा रिक्त आहे. त्यामुळे 12 जागांसाठी 28 अर्ज दाखल झाले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी विरोधी गटाच्या पॅनेलने आपल्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतल्याने 12-0 अशा सर्व जागा श्री निनाई श्री नवसरी शेतकरी पॅनेलने बिनविरोध करून त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
सर्वसाधारण गटातून विजयी उमेदवार – रमेश जगन्नाथ चव्हाण, मानसिंग शंकर कदम, दिनकर गणपती चव्हाण, शंकर बाळू देसाई, वसंत शंकर पानस्कर, तुकाराम गोविंद चव्हाण, लक्ष्मण निवृत्ती कळंत्रे, काशिनाथ जगन्नाथ चव्हाण. महिला राखीव गटातून विजयी उमेदवार – दीपाली संदीप पानस्कर, विमल लहू देसाई, इतर मागास प्रवर्ग- विवेक महादेव यादव, अनुसूचित जाती जमाती- दत्तात्रय आप्पा भिसे या 12 जागा बिनविरोध आल्या असून एक जागा रिक्त राहिली आहे.
यावेळी संस्थेच्या कार्यालयासमोर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी प्रा. विश्वनाथ पानस्कर, सुरेश पानस्कर यांनी काशिनाथ चव्हाण, हिंदुराव पानस्कर, सदानंद पानस्कर, अशोक डिगे, सरपंच सुधाकर देसाई, गोरखनाथ देसाई, विठ्ठल कदम, भरत देसाई, शशिकांत पवार, मानसिंगराव नलवडे यांचे अभिनंदन करून बिनविरोधासाठी प्रयत्न केलेल्या सभासदांचे सर्व कार्यकत्यांचे आभार मानले.