मलकापूर शहरात १०० टक्के जनता कर्फ्यू; मनोहर शिंदेंनी मानले नागरिकांचे आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मलकापुर शहरातील नागरिकांनी आजपासुन पाच दिवस जनता कर्फ्यू पाळला आहे. कराड मलकापूर येथे वाढत असलेल्या कोरोना बाधीतांची संख्या व प्रार्दभाव  रोखण्यासाठी  मलकापूर शहरातील नागरिकांसह व्यवसायिकांनी  आजपासुन पाच दिवसा चा जनता कर्फ्यु  पुकारला आहे. मलकापूर नगरपालिकेने केलेल्या बंदच्या  आवाहनाला शहरात उर्स्फुत प्रतिसाद मिळाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्याकरता, माणसाचा जीव वाचवण्याकरता हा जनता कर्फ्यू महत्वाचा आहे. अनेकांचे हातावरचे पोट असून तसेच व्यवसाय असून तरिसुद्धा माणसाचा जीवाचे महत्व लक्षात ठेवून त्यांनी आपआपली कामे बंद ठेवली आहेत. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे कौतुक करतो असे म्हणत मलकापूरचे माजी नगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नागरिकांचे आभार मानले.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मलकापूरला दोन टप्प्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात शनिवार (ता. 12) ते मंगळवार (ता. 15) या पहिल्या चार दिवसांत अत्यावश्‍यक सेवा वगळून कडकडीत लॉकडाउन, तर त्यानंतरच्या चार दिवसांत सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

संशयितांच्या ऍण्टीजेन टेस्ट होणार
कोरोनाची तपासणी करण्यासाठी नगरपालिकेने तीन हजार किट आणण्याचा निर्णय घेतला आहे. ते किट आल्यानंतर चाचणी सुरू होणार आहे. प्रभागनिहाय दोन पोर्टेबल ऑक्‍सिजन किट पालिकेने आणले आहे. पाचवडेश्वरात स्वतंत्र कोविड स्मशानभूमी होत आहे. कोविड बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कऱ्हाड पालिकेवरील अंत्यविधीचा वाढता ताण विचारात घेता पालिकेने हे नियोजन केले आहे. त्यासाठी दहा कर्मचाऱ्यांची स्वयंसेवकासह नेमणूक केली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/681653345774138/

Leave a Comment