सीएए कायद्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान कोलकाता पोहचले आहेत. त्यामुळं राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आहे.

दरम्यान, कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या वर्धापन दिन सोहळ्याला ममता बॅनर्जी यांच्यासह नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा सतत विरोध करताना दिसत आहेत.

यातच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर १३ जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या (दि.१२) ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर दिसणार आहेत. दरम्यान, भेटीनंतर ”मी पंतप्रधानांना सीएए, एनआरसी आणि एनपीआ मागे घेण्यासाठी सांगितलं” अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली.

 

Leave a Comment