ममता मशिनरीचा IPO 19 डिसेंबरपासून खुला; गुंतवणूकदारांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ममता मशिनरी लिमिटेडने आपल्या आयपीओसाठी प्राइस बँडची घोषणा केली आहे. तसेच या प्राइस बँडची रक्कम 230 ते 243 रुपयांपर्यंत प्रत्येक शेअरसाठी ठरवण्यात आली आहे. हा आयपीओ 19 डिसेंबर 2024 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे , तसेच यामध्ये गुंतवणूकदार 18 डिसेंबर रोजी आपले अर्ज करू शकणार आहेत. रिटेल गुंतवणूकदारांसाठी आयपीओ 23 डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. तसेच याचे लिस्टिंग 27 डिसेंबर 2024 रोजी बीएसई आणि एनएसई या स्टॉक एक्स्चेंजवर होण्याची शक्यता आहे.

IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपाचा –

ममता मशिनरी लिमिटेडचा आयपीओ 179.39 कोटींचा आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपाचा असून, कंपनीकडून 74 लाख शेअर्स जारी करणार आहे. प्रत्येक लॉटमध्ये 61 शेअर्स असतील, ज्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14823 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी प्रति शेअर 12 रुपयेची विशेष सूट देण्यात आली आहे. यात वाटपाचे प्रमाण 50% हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) राखीव आहे. तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35% आणि नॉन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी 15% हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

आर्थिक वर्षातील उत्पन्न –

वित्त वर्ष 2024 मध्ये कंपनीने 236.61 कोटींचे उत्पन्न कमावले, जे 2023 मध्ये 200.87 कोटी होते. यासोबतच 2024 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 36.13 कोटी होता, जो 2023 मध्ये 22.51 कोटी होता. हा आयपीओ प्रामुख्याने प्लास्टिक व पॅकेजिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या इच्छाशक्ती असलेल्या गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी ठरू शकते.

प्लास्टिक बॅग तयार करणारी आघाडीची कंपनी –

ममता मशिनरी लिमिटेड ही भारतातील प्लास्टिक बॅग तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी पाउच मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग मशिनरीच्या उत्पादनात विशेष तज्ञ आहे आणि विविध उद्योगांमध्ये तिची प्रस्थापना आहे. ममता मशिनरीच्या ग्राहकांमध्ये बालाजी वेफर्स, दास पॉलिमर्स, सनराईज पॅकेजिंग, ओम फ्लेक्स इंडिया आणि वीउ पॉलीप्लास्ट यांसारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीचे उत्पादन आणि सेवा उच्च दर्जाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत, जे उद्योग क्षेत्रात त्यांना एक महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्यास मदत करतात.