वडिलांनी केली आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली अन्….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी त्याच्या मुलीच्या बॅगमध्ये एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमुळे आपल्या पतीने त्याला होणाऱ्या मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याचे पत्नीला समजले. यानंतर या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हि धक्कादायक घटना नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोपळनगरमध्ये घडली. काही दिवसांपूर्वी प्रदीप मारवाडे नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. गळफास घेऊन त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला होता. मात्र त्यांनी हि आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नव्हते.

काय आहे प्रकरण?
प्रदीप मारवाडे यांच्या आत्महत्येनंतर तीन दिवसांनी म्हणजेच 24 फेब्रुवारीला प्रदीप यांच्या मुलीच्या बॅगमध्ये प्रदीप यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट त्यांच्या कुटुंबियांना सापडली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आरोपी पंजू तोतवानी याच्या नावाचा उल्लेख होता. पंजूकडून आर्थिक गोष्टीवरुन होणाऱ्या मानसिक त्रासावरून आत्महत्या करत असल्याचे प्रदीपने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

सुसाईड नोटच्या आधारे कारवाई
पती प्रदीप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या पत्नीने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. या तक्रारीवरून आरोपी पंजू तोतवानी याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

राजकीय नेत्यांशी स्नेहसंबंध
पंजू तोतवानी याच्यावर याअगोदरदेखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्याचे विविध राजकीय नेत्यांशी त्याचे स्नेहसंबंध असल्याचे समजत आहे. याचाच फायदा घेऊन तोतवानी लोकांना त्रास देत होता. यानंतर प्रतापनगर पोलिसांनी यासंदर्भात तोतवानीला अटक करुन मृत व्यक्तीचे आणि आरोपीचे काय संबंध आहे, तसेच मृत व्यक्तीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment