धक्कादायक ! भावाने बहिणीसाठी पाठवले जेवण, डिलिव्हरी बॉयकडूनच डॉक्टरवर बलात्कार

0
135
Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी रात्री एका महिला डॉक्टरवर तिच्याच घरात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव सुकांत बेहरा असे असून तो एका ढाब्याच्या मालकाचा मुलगा आहे. या आरोपीने 32 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार केला आहे. हा आरोपी डॉक्टरच्या घरी फूडची डिलिव्हरी करण्यासाठी गेला असता आरोपीने हे कृत्य केले आहे. हि घटना ओडिसाच्या अंगुल जिल्ह्यामधील आहे.

पीडित महिला एका आरोग्य केंद्रात काम करते आणि ती आपल्या भावासोबत केंद्राकडून देण्यात आलेल्या एका क्वार्टरमध्ये राहत होती. हि घटना घडली तेव्हा पीडित महिला घरी एकटीच होती. मंगळवारी रात्री पीडितेच्या भावाने तिच्यासाठी एका स्थानिक ढाब्यावरुन जेवण पाठवले होते. तो स्वतःदेखील याच ढाब्यावर बसून जेवत होता. यानंतर भावाने आपल्या बहिणीसाठी जेवण पार्सल पाठवायला लावले. तेव्हा या ढाब्याच्या मालकाचा मुलगा सुकांत रात्री अकरा वाजता जेवण घेऊन पीडितेच्या घरी पोहोचला.

यानंतर डॉक्टर तरुणी ही घरात एकटी असल्याचे पाहून तो घरामध्ये शिरला. यानंतर त्याने परिस्थितीचा फायदा घेत या डॉक्टर महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी बहीण-भावाने छेंडीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. यानंतर या पीडित डॉक्टर महिलेला तपासणीसाठी पाठवण्यात आले. यानंतर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here