आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक; निघाला सुशांतसिंगचा जबरा फॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या इसमास बंगळुरू येथे अटक करण्यात आली असून संबंधित व्यक्तीचे नाव जयसिंग राजपूत असे असून तो दिवंगत अभिनेता सुशांतसिंग रजपूत यांचा जबरा फॅन असल्याचे समजत आहे.जयसिंग राजपूत याने आदित्य ठाकरे यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून धमकी दिली होती.

आदित्य ठाकरे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेऱ बंगळूरुमधून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी तात्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला बड्या ठोकल्या.

काय आहे प्रकरण?

बंगळुरुहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत याने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. त्यानंतर त्याने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Leave a Comment