हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नीचे म्हणजेच डॉ. मंगळा नारळीकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या कर्करोग आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण नारळीकर कुटुंबाबर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मंगळा नारळीकर यांचा गेल्या अनेक महिन्यापासून कर्करोगाचा त्रास पुन्हा सुरु झाला होता. त्याच्यांवर रुग्णालयात उपचार प्रक्रिया सुरु होती. मात्र त्यांची आज आपल्या राहत्या घरी प्राणज्योत मावळली आहे. जयंत नारळीकर यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी मंगला नारळीकर यांचे मोठे योगदान लाभले आहे. त्यांनी आपल्या पतीला नेहमीच खंबीरपणे साथ दिली.
मंगला नारळीकर यांचा जन्म राजवाडे कुटुंबात १७ मे १९४३ रोजी झाला. त्याचे गणित या विषयावर प्रभुत्व होते. लहान मुलांना अगदी सोप्या भाषेत गणित समजून सांगण्यामध्ये त्यांचा हातखंड होता. मंगळा नारळीकर यांनी मुंबई विद्यापिठातून आपले शिक्षण सुरु केले त्यांनी १९६४ मध्ये परिक्षा देत एम. ए झाल्या. यावेळी त्या विद्यापिठात प्रथम आल्या होत्या. मंगला नारळीकर यांनी सहायक संशोधक आणि सह्योगी संशोधक अशा पदांवर काम कले आहे. तसेच त्यांनी इतर सामाजिक क्षेत्रात देखील काम केले आहे. त्यांनी अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके लिहली आहेत. विशेष म्हणजे, भेटलेली माणसं, पाहिलेले देश, नभात हसरे तारे अशी अनेक पुस्तके त्यांची गाजलेली आहेत.
दरम्यान १९६५ साली जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी मंगला राजवाडे यांचा विवाह झाला होता. यावेळी त्यांनी आपल्या कामासहित जयंत नारळीकर यांच्या कामात देखील मदत केली. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आहेत. तर प्राध्यापक विष्णू नारळीकर हे त्यांचे सासरे आहेत.