टीम हॅलो महाराष्ट्र |“आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळणारे प्रत्येक मत मोफत वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या विरोधात असेल”, असा घणाघात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.
आप सरकारच्या जनकल्याणकारी धोरणांच्या लाभार्थ्यांना ‘फुकटे’ म्हणून संबोधून भाजपा त्यांचा अपमान करीत असल्याचा दावा सिसोदिया यांनी केला. ते म्हणाले की, भाजपने दिल्लीतील जनतेची माफी मागावी.
दिल्ली की जनता को बिकाऊ कहने पर @msisodia का भाजपा पर हमला
देखें पूरी प्रेस कॉन्फ्रेंस- pic.twitter.com/8CKTufPAov
— AAP (@AamAadmiParty) January 11, 2020
दिल्लीच्या नागरिकांना फुकटे म्हटल्याबद्दल भाजपाने त्यांची माफी मागितली पाहिजे. जनतेची सेवा करणं प्रत्येक सरकारचं कर्तव्य असलं पाहिजे. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी इथं आहोत.
ते म्हणाले की, भाजप मोफत वीज, पाणी आणि आरोग्य सेवांच्या विरोधात आहे. हा पक्ष म्हणून त्यांचा अजेंडा असू शकतो, परंतु दिल्लीत जे नागरिक कल्याणकारी धोरणांचे लाभार्थी आहेत त्यांचा अपमान करू शकत नाहीत.