अखेर! मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे; तर दुसरीकडे रास्ता रोकोमुळे गुन्हाही दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्बल सतरा दिवसानंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. आता जरांगे पाटील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्यांनी ‘उद्यापासून राज्यात धरणे आणि साखळी उपोषण करा” असे आवाहन मराठा बांधवांना केले आहे. गेल्या 17 दिवसांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी (OBC ) कोट्यातून आरक्षण द्यावे, या मागणीला धरून जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र त्यांनी आज हे उपोषण मागे घेतले आहे.

मुख्य म्हणजे, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, या मुद्द्याला घेऊन जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र या आंदोलनाला 2 दिवस होताच राज्यभरात मराठा आंदोलनाचे पडसाद दिसून यायला लागले आहेत. आज पेटून उठलेल्या मराठा आंदोलकांकडून परिवहन महामंडळाची बस जाळण्यात आली आहे. तर, जालन्याच्या भागात दगडफेक देखील करण्यात आली आहे. मराठा आंदोलनाचे पडसाद बघता 3 जिल्हयात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल

दरम्यान, एकीकडे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असता दुसरीकडे त्यांच्या अडचणीत वाढ करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जरांगे पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर मराठा आंदोलन आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.