Manoj Jarange On Chitra Wagh : तेव्हा कुठं झोपली होतीस का? मनोज जरांगे चित्रा वाघ यांच्यावर संतापले

Manoj Jarange On Chitra Wagh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange On Chitra Wagh । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी यावरून जरांगे यांच्यावर टीकेची झोड उठवली. परंतु मी शिवी दिलीच नाही, आणि बोलण्याच्या ओघात शिवी दिली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल. यावेळी जरांगे पाटलांनी चित्रा वाघ यांच्यावर मात्र चांगलंच तोंडसुख घेतलं. आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तू कुठं झोपली होतीस का? असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर संताप व्यक्त केला.

तू माझ्या नादी लागू नकोस- Manoj Jarange On Chitra Wagh

आज प्रसारमाध्यांनी जरांगे यांना शिवीच्या आरोपावर प्रश्न केला असता ते आणखी आक्रमक झाले. चित्रा वाघ यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, ती जी बाई बोलली, कोण वाघीण , तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा दिसलं नाही का? आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तू कुठं गेली होतीस? कुठं मेली होतीस? आमच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या तेव्हा झोपली होतीस का तू? तेव्हा नाही का तुला आमची आई दिसली? तेव्हा जात दिसली नाही का? तू कोणाचे खेटर चाटतेस असं म्हणत जरांगे पाटलांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. तू माझ्या नादी लागू नकोस. तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?, असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर संताप व्यक्त केला. Manoj Jarange On Chitra Wagh

फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे-

यावेळी मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही, परंतु जर मी बोलण्याच्या ओघात शिवी दिली असेल तर मी आज मोठ्या मनाने माझे शब्द मागे घेतो. माझं मन मोठं आहे, तुमच्यासारख नाही.. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटलांनी पुन्हा उचलून धरली. देवेंद्र फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे, तू मुख्यमंत्री आहेस. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते, त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई-बहि‍णींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तुमच्या आईप्रमाणे आमच्या आईकडे पहा आणि तिच्या लेकरांना आरक्षण द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.