Manoj Jarange Patil : तुम्ही गोळ्या घातल्या तरी….. ; शिवनेरीवरून जरांगेंनी फुंकलं रणशिंग

Manoj Jarange Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil सरकारने मुंबईतील उपोषणाला फक्त एकदा दिवसाची मुदत दिली आहे.. माझा मराठा समाजाचा अपमान आहे, हा माझाही अपमान आहे.. सरकार जाणून बुजून सातत्याने अपमान करत आहे,कारण मी त्यांना मॅनेज होत नाही. होय, तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी आता मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केलेले मनोज जरांगे पाटील हे सध्या शिवनेरीवर पोचले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

फडणवीस, तुम्ही आमचे शत्रू नाही – Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही मला जसं एक दिवस उपोषण करण्याची मुदत दिली, तसेच तुम्हीही एका दिवसात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा… सरकार समाजाला मूर्ख बनवतंय, प्रत्येक वेळी समाजाचा आणि माझा जाणूनबुजून अपमान करत आहेत, कारण मी त्यांना मॅनेज होत नाही.. पण आता मी हटत नाही, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे त्या गोळ्या झेलणार आहे, परंतु मागे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस, तुम्ही आमचे शत्रू नाही आहात. त्यामुळे मोठ्या मनाने वागा, आडमुठी भूमिका घेऊ नका. गोरगरीब मराठ्यांच्या वेदना समजून घ्या….. तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिले तर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, त्यामुळे मराठ्यांची मने जिंकण्याची सुद्धा हीच संधी आहे असं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हंटल.

दरम्यान, रात्री आम्ही मुंबईत पोहचू… आज पवित्र शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेऊन रात्रीपर्यंत आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर पोहचू आणि आमदार्न उपोषण करू. मराठ्यांनो, संयम ठेवा, शांततेत सगळं करा.. तुमच्या एका चुकीमुळे समाजाच्या हातातोंडात आलेला घास जाता कामा नये.. गडबड गोंधळ करू नका.. मी शांततेने मराठ्यांच्या पदरात एक एक गोष्ट टाकत चाललोय,, हे प्रत्येकाने समजून घ्यायच आहे… थोडं संयमाने घ्या…. समाज आपल्याकडे आरक्षणाची आशा लावून बसला आहे, त्या स्वप्नावर पाणी फेरून द्यायचं नाही .. असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं…