हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची गडबड चालू झालेली आहे. आणि अशातच विधानसभा निवडणुकीतील एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आत्ता मराठा आंदोलक प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याची बातमी समोर आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर निवडून येण्याची तयारी केली होती. त्यानंतर त्यांनी 13 ते 14 जागांवर लढणार असल्याची माहिती सांगितली. परंतु आता ते विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केलेले आहे. मनोज जरांगे पाटलांनी 3 नोव्हेंबर रोजी ते कोणकोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत? हे सांगितले होते. परंतु आज म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी विधानसभा निवडणुकीतून ते माघारी घेण्यात असल्याची माहिती दिलेली आहे. तसेच एकाही जागेवर उमेदवार उभा न करण्याचे त्यांनी सांगितलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. याबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आम्ही रात्री साडेतीन पर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही निवडणुकीत मित्र पक्षासोबत दलित आणि मुस्लिम उमेदवार उभे करणार होतो. परंतु आता एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे किंवा ती निवडणूक जिंकणे शक्य होणार नाही. कारण आम्ही राजकारणात अगदीच नवीन आहोत. जर आम्ही एखादा उमेदवार उभा केला आणि तो उमेदवार पडला, तर त्या व्यक्तीची नाही, तर त्या संपूर्ण जातीची लाज जाणार आहे. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढणार नाही. असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या मराठी उमेदवारांना विनंती करतो की, आपले उमेदवारी अर्ज मागे घ्या. निवडणूक हा आपला खानदानी धंदा नाही.” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. ताकदवान पक्षांनी एकत्र यावं लागेल. राजकीय प्रक्रिया हाताळणे ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रवासात अजून लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातात. मात्र निवडणुकीत मात्र लोकांची गोळा बेरीज करावी लागते.” मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्याच्या राजकारणात कोणती उलथापालथ होणार आहे? कोणती समीकरणे बदलणार आहेत? हे पाहणे महत्त्वाचे आहे.