Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय!! उद्यापासून पाणी पिणं बंद

Manoj Jarange Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील २ दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण पुकारलं आहे. लाखो मराठा बांधव मुंबईत गेले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. याच दरम्यान, जरांगे पाटील यांनी आज टोकाचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पाणीही पिणं बंद करणार आहेत. जरांगे पाटलांच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे. आता सरकार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कस हाताळतंय ते बघावं लागेल.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, काल आणि आज मी पाणी प्यायलो. उद्यापासून मी पाणी घेणार नाही. पाणी बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आता माझं उपोषण कडक करणार आहे. तुम्ही सर्वानी शांत राहावा. सरकारने आपल्यावर कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपली उपोषणाची लढाई आणखी बोथट केली.

राज ठाकरेंवर टीका- Manoj Jarange Patil

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. तुमचे ११ ते १३ आमदार निवडून दिले. ते पळून गेले. आम्ही विचारलं का. देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेला तुझा गेम केला, विधानसभेला तुझ्या मुलाला पाडलं. तरी आम्ही विचारलं का? तुम्ही पुण्याला गेला, नाशिकला गेला, आम्ही विचारलं का? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंचा पाणउतारा केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या कोणत्या?

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.