हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची येत्या 8 जून रोजी बीडमध्ये (Beed) जाहीर सभा पार पडणार होती. परंतु आता ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 911 एक्करांवर होणाऱ्या या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु आता हीच सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा रद्द करण्यामागे नेमके कारण काय?? असा सवाल विचारला जात आहे.
महत्वाचे म्हणजे, सध्या बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे तेथील लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. अशातच बीडमध्ये मनोज जरांगे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेला येणाऱ्या लोकांची असुविधा होऊ नये. त्यामुळे ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांची ही सभा नारायण गडावर होणार होती. तसेच या सभेला 6 कोटीपेक्षा अधिक मराठा बांधव उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
बीडमध्ये होणाऱ्या या सभेची संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू होईल. असे असतानाही ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बीडमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. याठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये. अशी परिस्थिती असताना बीडमध्ये सभा घेतली असती तर सभेसाठी आलेल्या लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागला असता. त्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे उष्णतेने लोक आहेत. या सर्व बाबींचा विचार करूनच बीडमधील सभा रद्द करण्यात आली आहे.