हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी निधन (Manoj Kumar Passes Away) झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यवर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी- Manoj Kumar Passes Away
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. ते गेल्या काही महिन्यांपासून डिकम्पेन्सेटेड लिव्हर सिरोसिसने ग्रस्त होते, प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. अखेर आज पहाटे ४:०३ वाजता मनोज कुमार यांनी अखेरचा श्वास (Manoj Kumar Passes Away) घेतला. मनोज कुमार यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान नेहमीच लक्षात राहील. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कार आहेत. भारतीय कलाक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Legendary actor Manoj Kumar passes away at 87
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2025
Read @ANI Story | https://t.co/93JMIfKDc2#ManojKumar #actor #Mumbai pic.twitter.com/iBKAvneYQ7
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनोज कुमार यांना शृंद्धांजली वाहीली आहे. “प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते, विशेषतः त्यांच्या देशभक्तीच्या भावनेसाठी त्यांचे स्मरण केले जाते. हे त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून आले. मनोज जी यांच्या कामांनी राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली. ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत असं मोदींनी म्हंटल.