मथुरा : वृत्तसंस्था – मथुरा जिल्ह्यातील बरसाना गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मांत्रिकाने विवाहित महिलेला रात्रीच्या वेळी उपायांकरिता भेटायला बोलवून तिच्यावर बलात्कार केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलीस मांत्रिकाचा शोध घेत आहे.
काय आहे प्रकरण
मथुरा जिल्ह्यातील बरसाना गावात नरेंद्र नावाचा एक मांत्रिक त्याचा मित्र संदीप तोमर याच्यासोबत आला होता. त्याने गावातील काही लोकांवर त्याच्या अघोरी उपायांचे प्रयोग केले होते. या दरम्यान गावातील एक विवाहित महिला त्याच्याकडे तिची तक्रार घेऊन आली होती. त्यावेळी मांत्रिकाने त्या महिलेला कि, ‘तू रात्रीच्या वेळी भेटायला ये, त्यावेळी तुला उपाय सांगतो.
यानंतर हि महिला रात्रीच्या वेळी मांत्रिकाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. तेव्हा मांत्रिकाने तिच्या समस्येवर उपाय करण्याऐवजी तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने या घटनेची माहिती बरसाना पोलीस ठाण्यात दिली. तेव्हा पोलिस मांत्रिक आणि त्याच्या मित्रांना पकडण्यासाठी पोहोचले पण तोपर्यंत मांत्रिक त्याच्या मित्रासह पळून गेला. पोलीस मांत्रिक नरेंद्र याचा शोध घेत आहेत तसेच पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे. आरोपी मांत्रिक आणि त्याच्या मित्रांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आझाद सिंह पाल यांनी दिली आहे.