फिक्सिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर शाकीब पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अगोदर मॅच फिक्सिंगप्रकरणी बुकींनी संपर्क केल्याची माहिती शाकीबने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई झाली होती. आता शाकीब बायो-बबलचा प्रोटोकॉल तोडल्यामुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

हा सगळा प्रकार 4 जून रोजी घडला होता. ज्यावेळी मोहम्मदन स्पोर्टिंग क्लबची एकपण मॅच नव्हती, पण शाकीब मिरपूरमधल्या एका आयोजन स्थळावर दिसला होता. त्यादरम्यान शाकीब त्याचा सहकारी आसिफ हरन आणि रुयल मिया यांच्यासोबत सराव करत होता. त्या ठिकाणी सराव करताना तिकडे असलेले बॉलर्स मोहम्मदन किंवा बायो-बबलचा हिस्सा नव्हते. ज्यावेळी शाकीब सराव करत होता त्यावेळी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती त्याच्या संपर्कात आली. तसेच त्याने शाकीबसोबत फोटोदेखील काढले. हा बॉलर शाकीब क्रिकेट अकादमीचा असल्याचे समजत आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि ढाका मेट्रोपोलीस क्रिकेट समितीने एक बैठक बोलावली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू यामध्ये दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर काजी इमाम यांनी सांगितले आहे. जे काही झाले त्यामुळे आम्ही नाराज आहे. आमच्यासाठी टीम, खेळाडू आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. बायो-बबल तयार करण्यासाठी आम्हाला खूप पैसे भरावे लागले आहेत आणि मेहनतही घ्यावी लागली आहे, असेदेखील काजी इमाम म्हणाले.

Leave a Comment