अजितदादांना शरद पवारांचा दे धक्का! पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांना पक्षप्रवेश

sharad pawar ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थित त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये दादा गटाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह वीस माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. खरं तर पिंपरी चिंचवड हा अजितदादांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र याच गडाला आता सुरुंग लावण्याचे काम शरद पवारांनी केलं आहे. पवारांच्या या खेळीने दादा गटाला विधानसभेत पिंपरी- चिंचवडमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे.

काल (मंगळवारी) या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. त्यानंतर आज सर्वानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. तर शरद पवारांनी पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये येत दादा गटाला हादरा दिल्याची चर्चा पुण्यात जोरात सुरु आहे.

कोणकोणत्या नेत्यांनी केला शरद पवारांच्या गटात प्रवेश?

अजित गव्हाणे- शहराध्यक्ष
राहुल जाधव – कार्याध्यक्ष
हनुमंत भोसले – माजी महापौर
वैशाली घोडेकर – माजी महापौर
समीर मासुळकर – माजी नगरसेवक
पंकज भालेकर – माजी नगरसेवक
समीर वाबळे – माजी नगरसेवक
गीता मंचरकर – माजी नगरसेवक
वैशाली उबाळे – माजी नगरसेवक
शुभांगी बोऱ्हाडे – माजी नगरसेवक
विनया तापकीर – माजी नगरसेवक
संगीता ताम्हाणे – माजी नगरसेवक
रवींद्र सोनवणे – (पती, माजी नगरसेविका दिवंगत पौर्णिमा सोनवणे)
यश साने – पुत्र, दिवंगत नगरसेवक दत्ता साने
वसंत बोऱ्हाटे – माजी नगरसेवक
संजय नेवाळे – माजी नगरसेवक
प्रवीण भालेकर – माजी नगरसेवक
निवृत्ती शिंदे – माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ