Tuesday, January 7, 2025

आगामी काळात सर्वसामान्य जनतेसाठी ऊर्जा मंत्रालयाकडून अनेक योजना येणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

औरंगाबाद : आज शहरात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एक दिवशीय दौरा केला. शपथविधीपासून आजपर्यंत पहिल्यांदाच डॉ. नितीन राऊत हे औरंगाबादला आले. सर्व प्रथम त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकलं गेट येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर वाळूज येथे जाऊन ऊर्जा उपकेंद्राचे उदघाटन केले. त्यानंतर यांनी औरंगाबाद येथील महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालय येथे येऊन वृक्षलागवड केली.

औरंगाबादला २४ तास अखंडित वीजपुरवठा करू केला जाईल. त्याच बरोबर वीजपुरवठा दर्जेदार करू केला असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात कृषी वीज जोडणी उपक्रम राबवत असल्याचीही माहिती डॉ. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पदोन्नती आरक्षणाबद्दल विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले.

या बरोबरच वीज बिल माफी बद्दल त्यांनी बोलताना वीज बिलात माफी हि केंद्र आणि राज्य सरकारच्या हातात आहे. त्यावर आम्ही फक्त वीज बिलाचे हप्ते पडून देण्यास सक्षम आहोत बिल माफी आम्ही करू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले. अनेक योजना आगामी काळात आम्ही घेऊन येत अहोत असेही सांगितले. त्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पहि असतील अशी माहिती राऊत यांनी दिली.

दरम्यान,त्यांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालयाची पाहणी केली. यावेळी रोहिया मंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तियाज जलील आणि महावितरण माजी अध्यक्ष याचीही उपस्थिती होती.