कुछ तोह गडबड है..! कंगनाचा नवा फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्या भलत्याच चर्चा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कंगना रनौत हि एक अशी अभिनेत्री आहे जी सतत या ना त्या कारणामुळे सारखी चर्चेत येत असते. मग यासाठी एखाद वादग्रस्त विधान किंवा तिचा बदललेला लूक सुद्धा पुरेसा असतो. तिच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा तिची वादग्रस्त विधाने जगभर डंका गाजवतात आणि तिला चर्चेत आणतात. यावेळी मात्र कहरच झाला. कंगनाचा एक नवा फोटो सोशल मीडियावर सध्या वायरल होतोय. हा फोटो पाहून ती प्रेग्नेंट तर नाही ना अश्या पद्धतीच्या चर्चाना उधाण आले आहे. तर काहीजण म्हणतायत, कि हा नव्या चित्रपटाचा लूक असेल. आता कंगनाला जर माहित असत, कि तीच वाढलेलं वजन अश्या चर्चा उठवेल तर कदाचित तिने स्वतःकडे थोडं जास्त लक्ष दिलं असतं.

कंगनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपले एक वेगळे असे स्थान निर्माण केले. तर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे तिने सोशल मीडिया जगतात धुमाकूळ घातला आहे. असा एकही मुद्दा नाही ज्यावर कंगणाने आपले विचार मांडले नाहीत. कोणत्याही मुद्द्यावर कंगणा हमखास आपले मत मांडत चर्चेत येते. आता कंगणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि ते हि या फोटोमुळे. काय कमाल आहे. चर्चेत येण्यासाठी केवळ एक फोटो कारणीभूत ठरला. कंगनाची हा फोटो इंस्टाग्रामवरील नेटसम्राट या अकाऊंटवरून अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी! असे कॅप्शन देत पोस्ट करण्यात आला आहे.

 

एरव्ही तिच्या लुक्सवर फिदा होत लवडवी कमेंट करणारे तिचे चाहते यावेळी मात्र तिच्याबाबत विविध चर्चा करताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये लग्न करण्यापूर्वी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. यामुळे अनेक जणांचे म्हणणे आहे कि कंगनासुद्धा प्रेग्नन्ट आहे. अशा आशयाच्या अनेकांनी विविध ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

या चर्चांचे मुख्य कारण म्हणजे कंगनाचे वाढलेले वजन आणि बाहेर आलेले पोट. या फोटोत हे दोन्हीही स्पष्ट दिसत असल्यामुळे कंगनाला पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फोटोत कंगनाचे वाढलेले वजनही दिसत आहे आणि अगदी पोटही प्रेग्नंट असल्याप्रमाणे बाहेर आले आहे. यामुळे साहजिकच कंगनाला पाहून ती प्रेग्नंट असल्याचे तिच्या चाहत्यांना वाटत आहे. अनेकांनी हा फोटो पाहून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना हवा दिली आहे. त्यामुळॆ कंगनाचा हा फोटो अतिशय वायरल झाला असून वारंवार तिचा हा फोटो पाहिला जात आहे. आता कंगणाचा बदललेला लूक पाहून तिच्या आगामी चित्रपटाशी काही संबंध तर नाही ना अशाही चर्चांनी हळू हळू डोकं वर काढलं आहे.

You might also like