मराठा आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींच्या घराबाहेत मुंडन आंदोलन

0
34
Thumbnail 1533292531617
Thumbnail 1533292531617
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | मराठा आंदोलनाला स्टंट म्हणुन हिनवणार्या पुण्यातील कोथरुड विधानसभेच्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरा बाहेर मराठा आंदोलकांनी (Maratha Morcha) मुंडन आंदोलन केले.
मराठा समाजाकडून राज्यातील आमदार आणि खासदारांच्या घरासमोर २ आॅगस्ट पासून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. काल गुरुवारी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या खा. वंदना चव्हाण यांच्या कार्यालयांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
मेधा कुलकर्णी यांनी मराठा आंदोलन हा स्टंट असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताने म्हटले होते. यामुळे मराठा आंदोलकामधे नाराजी पसरली होती. याचेच पडसाद आज उमटले. मराठा आंदोलकांनी कुलकर्णी यांच्या घराबाहेर सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कुलकर्णी यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्त मुंडन केले.

Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने

मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले त्यावेळी सरकारला जाग का आली नाही ? – छत्रपती शाहू महाराज

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत तत्परता दाखवता मग मराठा आरक्षणासाठी का नाही ? – छत्रपती उदयनराजे भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here