Wednesday, October 5, 2022

Buy now

पोलिस निरीक्षक बकाळेची बकाल वक्तव्य : मराठा मोर्चाची देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण | जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक किरण बकाळे याने मराठा समाजा बाबत बकाल वक्तव्य केल्याने त्याच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्याच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासनत एलसीबी (LCB) विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या किरण बकाळे याने राज्यातील प्रमुख असलेल्या मराठा समाजाबद्दल बकाल वक्तव्य केले. भारतीय समाजा मध्ये जातीवाचक, समाजा- समाजात तेढ निर्माण होईल व मराठा समाजाची व मराठा स्त्रियांची बदनामी होईल, अशी वक्तव्ये केली. यामुळे आता सामाजिक तेढ निर्माण होऊन संताप व्यक्त केला जात आहे. अशा विचित्र माणसाचा कडेलोट केला जावा, अशी मागणी केली आहे.

मराठा समाजातील महिलांच्या व पुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील, असे जाणीवपूर्वक आक्षेपार्ह एका शासकीय अधिकाऱ्याने विधान केले आहे. त्यामुळे राज्यात संताप जनक वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. यामुळे त्याच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला आजन्म कारावास देण्यात यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने करण्यात आली आहे.