नागपूर । मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. तेव्हा एका समाजासाठी नोकरभरतीला स्थगिती दिल्यास OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? असा थेट सवालही विजय वडेट्टीवारांनी केला आहे.
नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत
देशात जातीच्या लोकसंख्येनुसार त्या त्या वर्गासाठी आरक्षण द्यावं, ही आमची जुनीच मागणी आहे. देशात ज्या समाजाचं जेवढं प्रतिनिधित्व, त्या समाजाला तेवढे टक्के आरक्षण द्यावं, अशी गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता ही मागणी केलीय, असं मत कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Vijay Wadettiwar On Maratha Reservation)
काँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेचं तिकीट
वाचा सविस्तर -👉 https://t.co/7ltrMGBKtK@ShivSena @INCMaharashtra @UrmilaMatondkar #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 30, 2020
अखेर ४ दिवसांनंतर कांदा कांद्याचे लिलाव सुरू; भावात घसरण, केंद्राच्या धोरणाने शेतकरी तोट्यात
वाचा सविस्तर -👉 https://t.co/V0Wwdb9coj#onionmarket #onionbooty #HelloMaharashtra #Farmers #farmersmarket— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 30, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in