विद्या बालनच्या ‘मला जाऊदे’ गाण्यावर सई लोकूरचा बैठा डान्स; व्हिडीओ झाला वायरल

0
56
Sai Lokur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मराठी बिग बॉस’ सीजन १ फेम अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या सई कामात व्यस्त नसल्याने आपल्या चाहत्यांशी सातत्याने संवाद साधत असते. इतकेच नव्हे तर यासोबत ती आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या हटके स्टाईलमधले अनेक व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. मात्र तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ करतोय आहे. या व्हिडीओमध्ये सईचे हावभाव आणि बैठा डान्स तिचं चाहत्यांना चांगलाच आवडतोय. या हटके अंदाजाला विद्या बालनच्या मला जाऊदे या गाण्याचा भारी ठसका बसला आहे.

https://www.instagram.com/p/CPPlJSzp9nh/?utm_source=ig_web_copy_link

 

अभिनेत्री सई लोकूर तिच्या व्हिडीओ आणि वेगवेगळ्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. पण या व्हिडीओमुळे आणि मुख्य म्हणजे तिच्या दिलखुलास अंदाजामुळे सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये सई लोकूर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्या ‘फरारी कि सवारी’ या चित्रपटातील ‘मला जाऊदे’ या ठसकेबाज लावणीवर बैठी लावणी ते हि फुल्ल एक्प्रेसशनसह करताना दिसत आहे. एरव्ही मॉर्डन लूकमध्ये ग्लॅमरस दिसणारी सई यावेळी मात्र गुलाबी रंगाच्या पारंपारिक सहावारी साडीत आणि सुंदर अश्या पारंपरिक आभूषणांसह देखणी दिसत होती. त्यात या व्हिडिओतील सईचे हावभाव चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात अगदीच यशस्वी झाले आहेत.

https://www.instagram.com/p/Bxv1jj6pFDo/?utm_source=ig_web_copy_link

मराठी बिग बॉसचे पहिले पर्व, त्यातील स्पर्धकांमुळे खूपच गाजले होते. त्यातील एक स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर होती. स्पर्धेदरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात तिची मेघा धाडे, पुष्कर जोग यांच्यासोबत असलेली मैत्री खूप गाजली.

https://www.instagram.com/p/CIkGjTnJ4nR/?utm_source=ig_web_copy_link

नुकतेच सईचे तीर्थदीप रॉय याच्याश लग्न झाले असून ती आपल्या सुखी संसाराला लागली आहे. साई नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने, आपण प्रेमात पडलो असून आपल्याला आपला योग्य जोडीदार मिळाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या शिवाय आपल्या लग्नाचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सई २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मासोबत झळकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here