हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषयाची शिकवला जावा. यासाठी शासन प्रयत्न करत आहे. अशातच आता सरकारने मराठी हा विषय राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर आता इथून पुढे परीक्षेचा निकाल हा ग्रेड ऐवजी मार्क्स देऊन लावला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवला जाणार आहे. तसेच या विषयाची परीक्षा घेऊन त्याचे मार्क्स दिले जाणार आहेत. काही खाजगी शाळांमध्ये मराठी हा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतरच राज्य सरकारकडून आता हा एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे केलेले आहे.
या आधी देखील 1 एप्रिल 2020 रोजी मराठी भाषा ही सर्व माध्यमातील शाळांमध्ये शिकवली जावी. या संदर्भात शासनाने निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राज्यभरात हा टप्प्याटप्प्याने मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न देखील केला जात होता. परंतु मराठी या विषयाकडे थोडासा कानाडोळा करून जास्त गांभीर्याने हा विषय शिकवला जात नाही. याकडे सरकारने लक्ष दिलेले आहे. त्यामुळे आता इथून पुढे माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषय हा शिकून त्याची परीक्षा देखील घेतली जाणार आहे.
सरकारने मराठी भाषेचे शिक्षण प्रत्येक शाळांमध्ये देण्याचा निर्णय 2020 – 21 च्या काळातच घेतला होता. परंतु या काळात कोरोना हा विषाणू होता. त्यामुळे मुलांच्या शाळा अनियमित होत्या. त्यानंतर आता सरकारने पुन्हा एकदा मराठी भाषा ही खाजगी तसेच सरकारी शाळांमध्ये शिकवणे सक्तीचे केलेले आहे .आणि परीक्षा घेऊन त्याचे मूल्यांकन करण्यास देखील सांगितले आहे. याआधी इतर माध्यमातून शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेतली जायची. परंतु त्याची श्रेणी दिली जात होती. परंतु आता शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून मराठी भाषा विषयाची परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना श्रेणी ऐवजी गुण दिले जाणार आहेत.