‘टाईमपास 3’ ची जोरदार कमाई! 4 दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर आता ‘टाईमपास 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटालाही चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 4 दिवसांत टाईमपास -3 ने 4. 36 कोटी रुपयांची भरगोस कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत असून त्यांनी ‘पालवी’ आणि ‘दगडू’ ही पात्रं साकारली आहेत.

प्रथमेश परबने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. ‘पब्लिकच्या प्रेमासह मराठी ब्लॉकबस्टर टाइमपास 3 ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एण्ट्री. 4 दिवसांत कमावले 4. 36 कोटी, 2 नं. लवचा 1 नं. लोचा पाहण्यासाठी ‘टाइमपास 3’चं तिकीट बुक करा” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/CgwZkwVs96T/?utm_source=ig_embed&ig_rid=a34a6e46-b69a-4e1e-9a60-2859228c0542

दरम्यान, ‘टाइमपास 3’ या सिनेमात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. प्रेम, विनोद, संवेदना,भावनिकता आणि मस्तीभरा असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचा एकूण निर्मिती खर्च हा अंदाजे १० कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे तो भरून काढण्यासाठी या चित्रपटाच्या कमाईत अजून वाढ होणं गरजेचे आहे.