औरंगाबाद – दुचाकी, चारचाकी चालवणारे महिला तुम्ही पाहिली असेल. एसटी, ट्रक, रिक्षासह विमान चालवणारी महिला देखील पाहिली असेल. पण ज्या रेल्वेतून आपण प्रवास करतो ती रेल्वे ही एक महिला चालवते. काल जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वेतील नारी शक्ती म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या दिनी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेसचे सारथ्य एका महिला असिस्टंट लोको पायलटने केले. ही रेल्वे स्टेशनवर दाखल झाली आणि महिला रेल्वे चालक इंजिन कडे रवाना झाल्या.
धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस सारथ्य लोको पायलट अमितकुमार यांच्यासह औरंगाबाद रेल्वे स्थानकावर कार्यरत असणाऱ्या महिला असिस्टंट लोको पायलट स्नेहल सोमवंशी यांनी केले. ही रेल्वे रवाना होण्यापूर्वी सोमवंशी यांच्यासह रेल्वे स्टेशनवर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी असिस्टंट लोको पायलट कल्पना धनावत, वरिष्ठ तिकीट निरीक्षक वर्षा सावे, संगीता टिळेकर, रेल्वे सुरक्षा बलाच्या गुड्डी कुमार, लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हेडकॉन्स्टेबल सोनाली मुंडे, चीफ लोको निरीक्षक प्रेम सिंग, स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे आदींची उपस्थिती होती.