Marathwada Vidarbha Earthquake : मोठी बातमी!! मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात आज पहाटे भूकंपाचे धक्के (Marathwada Vidarbha Earthquake) बसले. मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सकासकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरलं आहे.

भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल- Marathwada Vidarbha Earthquake

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल एवढी होती. अनेक ठिकाणी घरांना भेगा गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भीतीनेघाबरून घराबाहेर आली . परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. हींगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा (Marathwada Vidarbha Earthquake) दावा नागरिकांकडून केला जातो आहे.

मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक घाबरून होऊन घराबाहेर पडले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या परिसरात हा भूकंप झाला.