IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सकडून Mark Boucher ची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

Mark Boucher
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mark Boucher : मुंबई इंडियन्स संघाकडून आगामी IPL 2023 साठी मोठा बदल करण्यात आला आहे. यंदाच्या पर्वासाठी दक्षिण आफ्रिकेचा महान विकेटकीपर मार्क बाउचर याची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

Mark Boucher to stand down as South Africa head coach after T20 World Cup - BelfastTelegraph.co.uk

यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून Mark Boucher  दीर्घकाळ दक्षिण आफ्रिका संघाचा भाग होता. तसेच यष्टिरक्षक म्हणून कसोटीत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेतील ‘टायटन्स’ या क्रिकेट फ्रँचायझीचा प्रशिक्षक म्हणून काम करत होता. तसेच आपल्या प्रशिक्षकपदाखाली त्याने या संघाला पाच देशांतर्गत विजेतीपदे जिंकून दिली आहेत. यानंतर 2019 साली त्याची दक्षिण आफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही निवड करण्यात आली. इथे संघाने त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना 11 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने जिंकले आहेत.

Mark Boucher (Former South Africa Cricketer): Age, Wife, Coach, Eye Injury

मार्क बाउचर Mi चा ब्रँड आणखी मजबूत करेल – आकाश अंबानी

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष असलेले आकाश एम. अंबानी यांनी सांगितले कि, “Mark Boucher चे मुंबई इंडियन्समध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होतो आहे. मैदानावरील त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून एक प्रशिक्षक म्हणून त्याने आपल्या संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. तसेच मला खात्री आहे की, मार्क Mi ब्रँडला आणखी मजबूत करेल.”

Mumbai Indians announce Mark Boucher as new head coach | Cricket - Hindustan Times

नवीन आव्हानांसाठी सज्ज – Mark Boucher

यावेळी बोलताना दिग्गज खेळाडू असलेला Mark Boucher म्हणाला की,” मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडले जाणे हा माझ्यासाठी एक विशेष सन्मान आहे. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीने ते जगभरात एक यशस्वी क्रिकेट फ्रँचायझी म्हणून ओळखले जात आहे. तसेच पुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी मी तयार आहे. मुंबई इंडियन्स हे नेतृत्व आणि खेळाडूंचे एक मजबूत युनिट आहे आणि याध्ये माझे योगदान देण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे.”

हे लक्षात घ्या कि, मुंबई इंडियन्सची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मुंबई इंडियन फ्रँचायझीकडे आहे, जो आयपीएलमधील एक प्रमुख संघ आहे. नुकतेच मुंबई इंडियन्सने आपल्या जागतिक विस्तार योजनेअंतर्गत #OneFamily Mumbai Indians आणखी दोन संघ तयार केले आहेत. यामध्ये UAE च्या MI Emirates आणि दक्षिण आफ्रिकेच्या MI Cape Town चा समावेश आहे. ग्लोबल ब्रँड व्हॅल्युएशन एजन्सी ब्रँड फायनान्सने अलीकडेच मुंबई इंडियन्सला AA+ ब्रँड स्ट्रेंथ रेटिंग दिले आहे. Mark Boucher

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.mumbaiindians.com/

हे पण वाचा :

LPG : आता मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे घरपोच मिळवा सिलेंडर

Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा

Post Office च्या ‘या’ योजनेत 100 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा भरपूर रिटर्न

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Nora Fatehi ची दिल्ली पोलिसांकडून 5 तास चौकशी

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन