Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्गने घेतले तलवार बनविण्याचे प्रशिक्षण; जपानी मास्टरसोबतचा फोटो केला शेअर

Mark Zuckerberg
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mark Zuckerberg) सोशल मीडिया फेसबुकचे सह संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आपण दिवसभरात व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवर बराच वेळ घालवत असतो. या ऍप्सच्या माध्यमातून आपण एकमेकांशी चॅटिंग करत असतो. एकप्रकारे सोशल कनेक्टिव्हीटी मेंटेन करत असतो. या सगळ्याचे श्रेय मार्क झुकरबर्ग यांना जाते. इतकेच काय तर स्वतः मार्क झुकरबर्गसुद्धा या सोशल मीडिया हँडलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

मार्क झुकरबर्ग हे सोशल मीडियावर कायम सक्रिय दिसतात. या माध्यमातून ते नेटकऱ्यांसोबत कनेक्ट राहंण्यासाठी विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट कायम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. (Mark Zuckerberg) आजही मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत दिलेली माहिती फारच रंजक आहे. पहा मार्क झुकरबर्ग यांची पोस्ट.

प्रचंड कामासोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यात विविध गोष्टींचा आनंद घेणारे मार्क झुकरबर्ग हे कायम वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत येतात. केवळ डिजिटल युगात नव्हे तर इतर काही क्षेत्रात देखील त्यांना रस आहे. दरम्यान त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ते एका अत्यंत वेगळ्या गोष्टीचा अनुभव घेत असल्याचे समजत आहे. नुकतेच त्यांनी कटाना ही जपानी तलवार कशी बनवायची? याचे जपानी मास्टरकडून प्रशिक्षण घेतले आहे.

(Mark Zuckerberg)या जपानी मास्टरचे नाव अकिहिरा असे आहे. मास्टर अकिहिरा यांच्याकडून प्रशिक्षण घेतानाचा व्हिडीओ आणि स्वतः बनविलेल्या तलवारीचा एक फोटोदेखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. ही पोस्ट मार्क झुकरबर्ग यांच्या zuck नावाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली आहे.

या पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आज दुपारी मास्टर अकिहिरा यांच्याकडून कटाना (तलवार) बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तुमची कला आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद’. मार्क झुकरबर्ग यांच्या पोस्टवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. यातील बरेच नेटकरी त्यांच्या कौशल्याचे आणि नवीन गोष्टी शिकण्याच्या जिद्दीचे कौतुक करत आहेत. (Mark Zuckerberg)