नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केटकॅपमध्ये 3,33,307.62 कोटी रुपयांची मजबूत घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी, शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप फेब्रुवारीमध्ये सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,49,97,053.39 कोटी रुपयांवर घसरली. यापूर्वी जुलै 2021 मध्ये,लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,35,49,748.9 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर आली होती. जानेवारीमध्ये लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,64,41,207.18 कोटी रुपये होती.
टीसीएस आणि रिलायन्सचे मोठे नुकसान
गेल्या आठवड्यात सोमवारी मार्केटकॅप 2,57,39,712.95 कोटी रुपये होती. गुरुवारी ती 2,42,24,179.79 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर आली. त्याच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू करण्याची घोषणा केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात 94,828.02 कोटी रुपयांनी घसरून 15,45,044.14 कोटी रुपयांवर आली. Tata Consultancy Services (TCS) ची मार्केटकॅप 1,01,760.91 कोटी रुपयांनी घसरून 13,01,955.11 कोटी रु[पये झाली.
खासगी बँकांचेही नुकसान झाले
HDFC बँकेची मार्केटकॅप 31,597.65 कोटी रुपयांनी घसरून 8,06,931.95 कोटी रुपयांवर आली. इन्फोसिसची मार्केटकॅप 5,501.34 कोटी रुपयांनी घसरून 7,12,443.09 कोटी रुपयांवर तर ICICI बँकेची मार्केटकॅप 5,07,414.1 कोटी रुपयांनी घसरून 13,240.66 कोटी रुपयांच्या तोट्यासह झाली.
HDFC ची मार्केटकॅप 6,929.03 कोटी रुपयांनी घसरून 4,35,233.9 कोटी रुपये झाली. हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केटकॅप 33,234.97 कोटी रुपयांनी घसरून 5,09,990.53 कोटी रुपयांवर आली.
SBI मार्केट कॅप
स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ची मार्केटकॅप 29,094.23 कोटींनी घसरून 4,30,924.87 कोटी रुपये झालीआणि बजाज फायनान्सची मार्केटकॅप 3,802.65 कोटींच्या तोट्यासह 4,20,653.95 कोटी रुपये झाली. भारती एअरटेलची मार्केटकॅप 13,318.16 कोटी रुपयांनी घसरून 3,78,098.62 कोटी रुपयांवर आली.
टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एसबीआय, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.