Stock Market : जोरदार अस्थिरतेमुळे बाजार सपाट पातळीवर बंद झाले, मेटल स्टॉक वधारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बुधवारी बाजारात प्रचंड अस्थिरता होती. वाढीसह, खुल्या बाजारांनी दिवसातील ट्रेडिंगमध्ये सर्वात खालची पातळी गाठली. सेन्सेक्स 300 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. मात्र, गेल्या सत्रात बाजारात रिकव्हरी होती. अस्थिरतेमुळे बाजार सपाट झाले. सेन्सेक्स 28.73 अंकांनी खाली येऊन 54525.93 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 2.15 अंक किंवा 0.01 टक्केच्या किरकोळ वाढीसह 16,282.25 च्या पातळीवर बंद झाला.

निफ्टीमध्ये टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, आयओसी, एनटीपीसी आणि हिंडाल्को हे टॉप गेनर ठरले. तर दुसरीकडे, श्री सिमेंट्स, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, बजाज ऑटो आणि आयसीआयसीआय बँक लूजर ठरले. सेक्टोरल इंडेक्समध्ये निफ्टी मेटल इंडेक्स 3 टक्क्यांनी आणि एनर्जी इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप 0.22 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.8 टक्क्यांनी घसरला.

Lumax AutoTech तिमाहीचा निकाल
पहिल्या तिमाहीत कंपनीला तोट्यातून नफा झाला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने 12.3 कोटींच्या नुकसानीच्या तुलनेत 3.4 कोटींचा एकत्रित नफा कमावला आहे. एकत्रित उत्पन्न 71 कोटी रुपयांपासून 260.5 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. 12.5 कोटी EBITDA नुकसानाच्या तुलनेत 16.2 कोटींचा EBITDA साध्य झाला

BSE वर एड-ऑन प्राइस बँड फ्रेमवर्कचे नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन नियम लिस्ट X, XT, Z, ZP, ZY, Y ग्रुप शेअर्सवर लागू होतील. या नियमानुसार, पुनरावलोकनाच्या तारखेला शेअरची किंमत 10 च्या वर असेल. शेअरची मार्केट कॅप 1000 कोटींपेक्षा कमी असावी. छोट्या शेअर्समध्ये अस्थिरता तपासण्यासाठी BSE ने हे पाऊल उचलले. शॉर्टलिस्ट केलेल्या शेअर्सवर वीकली प्राइस लिमिट लागू होईल. मंथली, क्वाटरली प्राइस लिमिट लागू होईल. एड-ऑन प्राईस बँड फ्रेमवर्कचे नियम 23 ऑगस्टपासून लागू होतील.

Leave a Comment