हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marleshwar Waterfall) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अनेक ऐतिहासिक तसेच नयनरम्य ठिकाणे आहेत. यामध्ये काही तीर्थक्षेत्रांचादेखील समावेश आहे. आज आपण अशाच एका तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. हे तीर्थक्षेत्र म्हणजे कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मार्लेश्वर. महाराष्ट्रातील कोकण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. इथले समुद्रकिनारे, पांढरी वाळू, नयनरम्य परिसर पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात.
तर कोकणातील मार्लेश्वराच्या (Marleshwar Waterfall) दर्शनासाठी देखील अनेक भाविक मोठा पल्ला पार करून येतात. या देवस्थानाची खासियत अशी की, हे अत्यंत जागृत देवस्थान नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात बारमाही कोसळणारा एकमेव धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतो. चला याविषयी अधिक जाणून घेऊया.
श्री क्षेत्र मार्लेश्वर
रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे भगवान शंभू महादेवाचे अत्यंत जुने आणि जागृत देवस्थान आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आणि आंगवली या गावापासून ११ किमोमीटर अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी हे पवित्र आणि जागृत देवस्थान वसलेले आहे. भोवतालचा रमणीय परिसर आणि हिरवीगार झाडी आपले लक्ष वेधून घेते. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ आणि त्यामध्ये बारमाही कोसळणारा (Marleshwar Waterfall) शुभ्र फेसाळलेला ‘धारेश्वर’ धबधबा या ठिकाणाचे चैतन्य वाढवतो. खास करून पावसाळ्यात या ठिकाणी भेट देण्याची मजाच काही औरच आहे.
बारमाही धारेश्वर (Marleshwar Waterfall)
मार्लेश्वर मंदिराशेजारी धारेश्वर नावाचा धबधबा आहे. जो बारमाही कोसळणारा असा नयनरम्य धबधबा आहे. या धबधब्यासमोर एक खोल डोह आहे ज्याच्या खोलाची अंदाज लावणे अत्यंत कठीण आहे. या परिसरातील वनराई आणि शांतता तसेच धारेश्वर धबधब्याची सुंदरता फारच मनमोहक आहे.
ऋतू बदलत राहिले तरीही धारेश्वर धबधबा कोसळायचा थांबत नाही. हे येथील एक खास वैशिष्ट्य आहे. (Marleshwar Waterfall) त्यामुळे वर्षाचे बाराही महिने या धबधब्याला पाणी असतं. वर्षाचे बारा महिने कोसळणारा हा धबधबा पहायला लोक कोणत्याही ऋतुत येऊ शकतात. खास करून पावसाळ्यात सह्याद्रीच्या दगडातून फेसाळत कोसळणारा हा धबधबा पाहण्यात विशेष आनंद वाटतो.
पावसाळ्यात पर्यटक करतात गर्दी
मार्लेश्वर परिसरातील धारेश्वर धबधबा बारमाही असल्याने हा धबधबा वर्षाचे १२ महिने कोसळतो. मात्र पावसाळ्यात सह्याद्रीच्या काडेकपाऱ्यांतून इतर छोटे छोटे धबधबे देखील कोसळू लागतात. (Marleshwar Waterfall) अनेकदा हे धबधबे एकत्र येऊन धारेश्वरला मिळतात. ज्यामुळे काही वेळा धारेश्वर धबधबा रौद्र रूप देखील धारण करतो. मात्र पावसाळ्यात या ठिकाणची गर्द वनराई, थंडगार वातावरण आणि उंचावरून कोसळणारा फेसाळलेला धारेश्वर धबधबा पाहून मन अगदी प्रफुल्लित होते. हा अनुभव घेण्यासाठी अनेक भाविक तसेच पर्यटक खास करून पावसाळ्यात या ठिकाणी गर्दी करतात.