मुंबई | सध्या जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक देश आणि कित्येक राज्य लॉकडाउनमध्ये आहेत. लॉकडाउनमुळे बॉलिवूड अभिनेत्री मेघना नायडू गेल्या महिन्याभरापासून दुबईत अडकली आहे. यातच मेघनाला तिचं लग्नही पुढे ढकलावे लागले. कलियों का चमन’ या गाण्यातून प्रसिद्ध झालेल्या मेघनाने काही सिनेमांमध्ये आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम केलं आहे.
मेघना आपल्या पतीसोबत दुसऱ्यांदा लग्न करणार होती. मात्र मेघना दुबईत ज्या ठिकाणी अडकली आहे तिथे कायदे फार कडक आहेत. भारतात जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी लोक सर्रास बाहेर फिरताना दिसत आहेत, तर दुंबईत मात्र या करता येत नाही.
दरम्यान मेघनाने काही दिवसांपूर्वीच टेनिस प्लेअर Luis Miguel Reis शी भारतीय पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर मेघना ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार होती. पण आता लॉकडाउनमुळे तिला आपल लग्न पुढे ढकलाव लागलं आहे.