लव्ह, सेक्स आणि धोका! विवाहित प्रियकराने एक्स गर्लफ्रेंडचा ‘या’ प्रकारे घेतला सूड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील एका युवकाने तरुणीसोबत आधी मैत्री केली आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरल्याचे समजताच त्या तरुणाने तिच्या सासरी फोन केला. त्याने फोन करून सांगितले कि, तुमची होणारी सून आधीच दुसऱ्या कोणाची झाली आहे. यानंतर सासरकडच्या लोकांनी हे लग्न मोडले. हा युवक स्वतःही आधीपासूनच विवाहित आहे. हि गोष्ट त्या मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले होते. मात्र, युवकाने इथेसुद्धा तिला धोखा दिला.

ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वालियर या ठिकाणची आहे. यानंतर तरुणीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी या युवकावर गुन्हा दाखल केला. ग्वालियरच्या मेवाती इथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने शेजारीच राहणाऱ्या गगन यादवविरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत म्हंटले कि तिची पाच वर्षांआधी आरोपीसोबत ओळख झाली होती. हि मैत्री अधिक घट्ट होताच या युवकाने तरुणीला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगितले. तसेच लग्न करून आयुष्यभर साथ देण्याचे वचनसुद्धा दिले. यानंतर त्याने या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. पाच वर्ष संबंध ठेवल्यानंतर तरुणीने जेव्हा लग्नाचा विषय काढला तेव्हा त्याने यास नकार दिला.

यानंतर या तरुणीने त्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असता तो युवक आधीपासूनच विवाहित असल्याचे समजले. यानंतर या तरुणीने त्याच्याबरोबर बोलणे बंद केले.या दरम्यान या तरुणीचे शहरातील एका व्यक्तीसोबत लग्न जमले. तिच्या लग्नाची तारीख ठरणार होती इतक्यात तिच्या होणाऱ्या सासरी एका नंबरवरुन फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले कि, त्यांची होणारी सून आधीच दुसऱ्याची झालेली आहे. यानंतर सासरच्यांनी हे ठरलेले लग्न मोडले. याबाबत अधिक चौकशी केली असता तरुणीला समजले कि गगनने केला होता. यानंतर याची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.