धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीने केले ‘हे’ घृणास्पद कृत्य

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी-चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पुण्याजवळील चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विवाहित प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीनं त्याचा सूड उगवला आहे. आरोपी प्रेयसीनं प्रियकराला चिंचवड परिसरातील एका लॉजवर बोलवून त्याचा खेळ खल्लास केला आहे. रात्री दहाच्या सुमारास लॉजमधील रुममध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी तरुणीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हत्या झालेल्या विवाहित प्रियकराचं नाव पैगंबर गुलाब मुजावर असं आहे. मृत पैगंबर आणि आरोपी तरुणी एकाच ठिकाणी कामाला होते. त्यामुळे दोघांत अनेकदा बोलणं व्हायचं. यातूनच वर्षभरापूर्वी पैगंबर आणि आरोपी तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काहीकाळ त्याचं नातं व्यवस्थित चालल्यानंतर मृत पैगंबर आरोपी तरुणीला भेटायला जात नव्हता. यादरम्यान आरोपी तरुणीने पैंगबरकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे मृत पैंगबरनं लग्नाला नकार दिला.

यानंतर आरोपी प्रेयसीनं पैंगबरच्या हत्येचा कट रचला. दोन दिवसांपूर्वी प्रेयसीनं पैगंबरला चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरातील व्हाईट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावलं. पैगंबरही नेहमीप्रमाणे तिला लॉजवर भेटायला गेला. पण आरोपी तरुणीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पैगंबर लॉजमध्ये आल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी तरुणीनं अचानक पैगंबरच्या गळ्याभोवती ओढणीचा फास टाकला आणि तो घट्ट आवळला. यामध्येच पैगंबरचा मृत्यू झाला. यानंतर रात्री दहाच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचं लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितलं. यानंतर लॉजमधील कर्मचाऱ्यांनी पैगंबरला तातडीने पुण्यातील वायसीएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.