कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे घडला आहे. यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्ये मागचं कारण अजून कळू शकलेलं नाही.
हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील विद्यानगर परिसरात गुरूदत्त काॅलनीमध्ये गुरुवारी दुपारी विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये विवाहीतेने विषारी औषध घेऊन तर आई वडीलांनी सिलींग फॅनला एकाच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शिवाजी आनंदा मोहिते (वय 59), सौ. बेबी शिवाजी मोहिते (43) व वृषाली विकास भोईटे (23) असे आत्महत्या केलेल्यांची नावे अाहेत.
आत्महत्येमागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. घरगुती वादातूनच सदर प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून कराड पोलीस याचा तपास करत आहेत.