कराड | कराड नजीकच्या जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना घडली. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती.कराड येथील जुन्या पूलाजवळ संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मजूर वीटभट्टीच्या कामानिमित्त भट्टी परिसरात काम करत होते. याच वेळेला संबंधित विवाहितेने जुन्या कोयना पुलावर जाऊन नदीपात्रात उडी घेतली. पात्राकडेला असणाऱ्या अन्य महिला व नागरिकांनी तात्काळ धाव घेतली व विवाहितेला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे पुलावर तसेच वीटभट्टी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.